मंगळावर आढळल्या वाळूच्या टेकड्या | पुढारी | पुढारी

मंगळावर आढळल्या वाळूच्या टेकड्या | पुढारी

न्यूयॉर्क :

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या खगोलशास्त्रज्ञांनी लालग्रह म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगळावरील अब्जावधी वर्षांपूर्वीच्या वाळूच्या टेकड्यांचा शोध लावला आहे. या ग्रहावरील एका दरीत एखाद्या शेतासारखे जमिनीत खोलवर वाळूच्या या टेकड्या सापडल्या. सुमारे एक अब्ज वर्षे जमिनीखाली दबल्याने त्या आता एखाद्या खडकाळ पर्वतासारख्या बनल्या आहेत.

खगोल शास्त्रज्ञांच्या मते, वाळूच्या या टेकड्यांच्या माध्यमातून मंगळावरील संरचना आणि भौगोलिक इतिहासाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते. याशिवाय मंगळाच्या भूगर्भाच्या इतिहासाचीही माहिती मिळू शकते. प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटचे प्लॅनेटरी शास्त्रज्ञ मॅथ्यू चोजनाकी यांच्या मते, मंगळाच्या जमिनीखाली सापडलेल्या या टेकड्या म्हणजे वाळूचे प्राचीन थरच आहेत. त्यांची निर्मिती किमान एक अब्ज वर्षांपूर्वी झाली असण्याची शक्यता आहे. टेक्टॉनिक्स व अन्य प्रक्रियांमुळेही या टेकड्यांचे कसलेच नुकसान झालेले नाही, हे अत्यंत महत्त्वाचे.मंगळाबाबतचा हा शोध खगोलशास्त्रज्ञांसाठी  अत्यंत महत्त्वाचा आहे. 

या शास्त्रज्ञांच्या मते, या ग्रहावर वाहणार्‍या वेगवान वार्‍यांमुळे वाळूच्या टेकड्या तयार होणे, ही सामान्य बाब आहे. मात्र, मंगळावरील वल्से मारिनारिस व मेलम चस्मा दर्‍यांमधील वाळूच्या या टेकड्या नुकत्याच तयार झाल्या असतील असे वाटते. 

Back to top button