700 कि.मी. लांब ट्रॅफिक जाम | पुढारी

700 कि.मी. लांब ट्रॅफिक जाम

पॅरीस :

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला रोखण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मँक्रो यांनी बुधवारी देशात दुसर्‍या लॉकडाऊनची घोषणा केली. ज्यावेळी मँक्रो आणि मंत्र्यांनी दुसर्‍या लॉकडाऊनचा निर्णय घेतला तेव्हा हा निर्णय नको असलेला विश्वविक्रम करणारा ठरेल, याची त्यांना कल्पनाही नसेल.

दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारी सायंकाळी राजधानी पॅरीसध्ये जो विक्रम बनला तो तोडणे कधी शक्य आहे, असे सध्या तरी वाटत नाही.आयफेल टॉवर असलेल्या या शहरात तब्बल 700 कि.मी. लांब ट्रॅफिक जाम झाले. या अनोख्या विक्रमाची सध्या जगभरात चर्चा सुरू  झाली आहे. 

लॉकडाऊनची घोषणा होताच लोकांनी शक्य तितक्या लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे देशातील तमाम लहान-मोठ्या शहरांतील रस्त्यांवर वाहनांची एकच गर्दी झाली. पॅरीसमध्ये तर याचा कहरच झाला. फ्रान्सच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी पॅरीसपासून इले द फ्रान्सपर्यंत ट्रॅफिक जाम झाले होते. हे अंतर तब्बल 430 मैल म्हणजे 700 कि.मी. होते.

Back to top button