बिझी... ऐश्‍वर्या | पुढारी | पुढारी

बिझी... ऐश्‍वर्या | पुढारी

नवी दिल्ली :

महानायक ‘बिग बी’ यांची स्नुषा व अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्‍वर्या राय-बच्चनला जगातील सर्वाधिक सुंदर महिलांपैकी एक मानले जाते. ती जितकी सुंदर आहे तितकाच तिचा अभिनयसुद्धा लाजवाब आहे. बॉलीवूडमध्ये ‘अ‍ॅश’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या ऐश्‍वर्याचा रविवारी (1 नोव्हेंबर) वाढदिवस. तिने 47 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त सेलिब्रिटी आणि मोठ्या संख्येने चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. याशिवाय ती अनेक आगामी नव्या चित्रपटांत दिसणार आहे. 

वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा एक सोशल मीडियावर व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये ती ‘निमुडा’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. यावर तिच्या चाहत्यांचा प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत. 

दरम्यान, वर्कफ्रंटची चर्चा करावयाची झाल्यास  ऐश्‍वर्या यापूर्वी ‘फन्‍ने खान’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत दिसली होती. तसेच उल्लेखनीय म्हणजे ऐश्‍वर्या आता ‘मेलफिसेंट : मिस्ट्रेस ऑफ एविल’च्या हिंदी व्हर्जनमध्ये हॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस अंजोलिना जॉलीच्या स्थानी  दिसणार आहे, तसेच मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटातही ऐश्‍वर्या दिसणार आहे. याशिवाय अनुराग कश्यप यांच्या ‘गुलाब जामून’ या चित्रपटातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या शानदार अभिनयाच्या बळावर वयाच्या 47 व्या वर्षीही अ‍ॅशने बॉलीवूडमधील आपले स्थान अबाधित ठेवले आहे.

Back to top button