कॅटरिना खबरदारी घेतेय | पुढारी | पुढारी

कॅटरिना खबरदारी घेतेय | पुढारी

मुंबई : बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफने आपले नवे छायाचित्र नुकतेच शेअर केले आहे. यामध्ये ती नव्या लूकमध्ये दिसून येत आहे. कोरोनापासून बचाव करून घेण्यासाठी या अभिनेत्रीने पीपीई किट परिधान केल्याचे हे छायाचित्र आहे. याशिवाय तिने फेसशिल्डही घातलेला आहे. मात्र, पीपीई किट व फेसशिल्ड घालून कोठ जात आहे? याचा मात्र काहीच तिने खुलासा केलेला नाही.

कॅटरिनाने हे छायाचित्र मुंबई विमानतळावरून शेअर केले आहे. यावेळी ती आनंदी दिसत होती. फोटो शेअर करताना कॅटरिनाने लिहिले आहे की, ‘सर्वप्रथम सुरक्षा’. आता यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.

कॅटरिना लवकरच ‘सूर्यवंशी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तसे पाहिल्यास हा चित्रपट गेल्या मार्चमध्येच प्रदर्शित होणार होता; पण कोरोनामुळे तो लांबणीवर पडला. अद्यापही या चित्रपटाची रीलिज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. ‘सूर्यवंशी’मध्ये अभिनेता अक्षय कुमार हा एटीएस अधिकारी वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कॅटरिना कैफ ही त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे. दरम्यान, ‘सूर्यवंशी’बरोबरच कॅटरिना ही ‘फोन भूत’ या चित्रपटात काम करणार आहे. यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी व इशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Back to top button