मंगळावर ४.४ अब्ज वर्षांपूर्वी झाली होती पाण्याची निर्मिती | पुढारी

मंगळावर ४.४ अब्ज वर्षांपूर्वी झाली होती पाण्याची निर्मिती

टोकिओ : खगोल शास्त्रज्ञांनी प्राचीन उल्कापिंडाच्या केलेल्या अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार ‘मंगळ’ अथवा लालग्रहावर सुमारे 4.4 अब्ज वर्षांपूर्वीच पाणी तयार झाले होते. जपानी शास्त्रज्ञांच्या पथकाने मंगळाच्या एका प्राचीन उल्कापिंडाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. काही वर्षांपूर्वी सहारा वाळवंटात दोन उल्कापिंड सापडले होते. त्यांना ‘एनडब्ल्यूए 7034’ व  ‘एनडब्ल्यूए 7533’ असे नाव देण्यात आले होते.

जपानी खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले की, सहारा वाळवंटात सापडलेले हे मंगळावरील नव्या प्रकारचे उल्कापिंड होते. त्यांची निर्मिती वेगवेगळ्या पर्वतांच्या तुकड्यांच्या मिश्रणाने झाली आहे. या उल्कापिंडांचा सविस्तर अभ्यास केला असता असे आढळून आले की, मंगळावर सुमारे 3.7 अब्ज वर्षांपासून पाणी आहे. मात्र, नव्याने संशोधन केले असता या लालग्रहावर सुमारे 4.4 अब्ज वर्षांपूर्वी पाणी होते.

‘सायन्स अ‍ॅडव्हान्स’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील माहितीनुसार लाल ग्रहाच्या निर्मितीच्या पहिल्या प्रक्रियेतच पाण्याची निर्मिती झाली असणार. या यशाने भविष्यात या ग्रहावर पाणी नेमके कोठून येते, याचे उत्तर शोधण्यास मदत मिळणार आहे. जपानी शास्त्रज्ञांचा हा मंगळाबाबतचा अत्यंत महत्त्वाचा शोध मानला जात आहे. यामुळे भविष्यात मंगळाबाबतची धारणा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Back to top button