भिकारी महिलेच्या खात्यात ‘दीड कोटी’ | पुढारी

भिकारी महिलेच्या खात्यात ‘दीड कोटी’

कैरो :

सर्वसामान्यपणे शहरातील अनेक प्रमुख ठिकाणी निश्चितपणे भीक मागणारे लोक आढळून येतात. काहीवेळा त्यांची अवस्था पाहून लोक भीक देतात. मात्र, तुम्हाला माहीत आहे का अशा लोकांची महिन्याकाठी होणारी कमाई किती असते. अशाच एका भिकारी महिलेेच्या खात्यात तब्बल दीड कोटी रुपये सापडले. ही महिला भिकारी आहे इजिप्तमधील.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार ही घटना इजिप्तमधील एका राज्यातील आहे. सध्या या महिलेला अटक करून पोलिस तिची चौकशी करत आहेत. भीक मारणार्‍या या 57 वर्षीय महिलेकडे तब्बल एक कोटी 42 लाख रुपये आले कुठून आणि कसे जमा झाले? याची पोलिस शहानिशा करत आहेत.

महिला भिकारी शरीराने अपंग असल्याचे दिसत होते. पाय नसल्याने व्हीलचेअरवर बसून ती भीक मागते. जणू आपल्याला पायच नाही, असे भासवून ती भीक मागत होती. तिने आजपर्यंत अनेक राज्यांत फिरून भीक गोळा केली आहे. 

मात्र, नेहमी व्हीलचेअरवरून भीक मागणारी ही महिला एकदा चक्क दोन्ही पायांनी चालताना आढळून आली. ही बाब पोलिसांना समजताच त्यांनी तिची चौकशी केली असता ती अपंग नसल्याचे आढळून आले. याशिवाय तिची बँक खाती तपासली असता त्यामध्ये तब्बल 1 कोटी 42 लाख रुपये आढळून आले. याशिवाय ती तब्बल पाच बंगल्यांची मालकीन असल्याचेही स्पष्ट झाले. यामुळे तिची कसून चौकशी करण्यात येत आहे.

 

Back to top button