ड्रॅगनसारखे दिसण्यासाठी खर्च केले लाखो रुपये

लंडन : माणसाला ज्यावेळी आपला शौक पूर्ण करावासा वाटतो, त्यावेळी तो कोणत्याही थराला जातो. असे लोक कितीही खर्च करण्यास प्रसंगी तयार असतात. अशाच एका माणसाचे नाव आहे टायमॅट लिजन मेडुसा. त्याने लाखो रुपये खर्च करून आपल्या चेहराच बदलून टाकला आहे.
टायमॅटने आपल्या शरीरामध्ये अनेक अजब दिसणारे बदल केले आहेत. यासाठी त्याने कॉस्मेटिक सर्जरी आणि बॉडिमॉडिफिकेशनची मदत घेतली. यासाठी टायमॅटने तब्बल 61 हजार पौंड इतका मोठा खर्च केला. त्याने आपल्या शरीरात अनेक मोठे बदल केले. त्याने कान काढून टाकले तर जीभ मधोमध उभी कापली. त्याचे एकच लक्ष्य आहे की तो चक्क डॅ्रगनसारखा दिसावा. यासाठी त्याचे बॉडिमॉडिफिकेशनचे काम आजही सुरूच आहे.
टायमॅटच्या मते, त्याच्या सावत्र बापाने त्याचा फारच छळ केला व दक्षिण टेक्सासच्या जंगलात सोडून दिले. तेव्हापासून त्याने विषारी रॅटलर सापालाच आई-वडील मानले. टायमॅटने सर्वप्रथम 1997 मध्ये बॉडी मॉडिफिकेशन करवून घेतले. त्यावेळी त्याने आपल्या डोक्यावर दोन शिंग लावून घेतली. यासाठी त्याने भारतीय चलनानुसार 29 हजार रुपये खर्च केले. टायमॅटने बॉडी मॉडिफिकेशन सुरुवातीला एक हौस म्हणून करवून घेतली. मात्र, हेच आता त्याच्या जीवनाचा एक भाग बनला आहे.