आकाशगंगेतून येत आहेत रेडिओ लहरी | पुढारी

आकाशगंगेतून येत आहेत रेडिओ लहरी

वॉशिंग्टन : खगोल शास्त्रज्ञांच्या मते, आपल्या आकाशगंगेच्या अंतर्गत भागातून रेडिओ उर्जेच्या रहस्यमयी स्फोटांचा आवाजांचा शोध लागला आहे. तीव्र रेडिओ स्फोट हा सेकंदाचा एक अंश असतो. असे असले तरी सूर्याच्या तुलनेत तब्बल 100 दशलक्ष पटीने जास्त शक्‍तिशाली असतो. इतकी प्रचंड तीव्रता असली तरी असे रेडिओ स्फोट अज्ञातच असतात. 

खगोल शास्त्रज्ञांनी तीव्र प्रकाशाच्या मार्गावर झालेल्या रेडिओ स्फोटाचे निरीक्षण करण्यात यश मिळविले. यामुळे या स्फोटांमुळे रेडिओ लहरी नेमक्या कोठून येत आहेत. याचा शोध लावण्यास मदत मिळणार आहे. यामुळे या गूढ लहरींसंदर्भातील गूढ उकलण्यास मदत मिळणार आहे.

अशाप्रकारच्या अवकाशीय स्फोटांवर नजर ठेवणे हे खगोल शास्त्रज्ञांसाठी फारच अवघड असते. कारण एक तर ते प्रचंड दूर असतात आणि असे स्फोट फारच कमी संख्येने होत असतात. अशा अवकाशीय घटनांचे अथवा एलियनबाबतची माहिती मिळविण्यासाठी अजूनही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

रेडिओ लहरींचा स्फोट झाल्यानंतर त्यातून एक शक्‍तिशाली चुंबकीय क्षेत्राची निर्मिती झाली आणि त्यातून एक ताराही आला आहे. ज्याला एफआरबी असे म्हटले जाते. खरे तर या स्फोटांच्या निरीक्षणास गेल्या 27 एप्रिलपासून सुरुवात झाली होती. या स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी दोन स्पेस टेलिस्कोपचा वापर केला होता. 

 

Back to top button