दोन चित्रपट पडले पुन्हा लांबणीवर | पुढारी

दोन चित्रपट पडले पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली : गेल्या मार्चच्या सुरुवातीलाच दोन मोठे चित्रपट रीलिज करण्यात येणार होते. यामध्ये रणवीर सिंग व दीपिका पदुकोन यांच्या ‘83’ तसेच अक्षय कुमार व कॅटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांचा समावेश होता. मात्र, देशातील कोरोना व्हायरसच्या प्रकोपाने हे चित्रपट रीलिज करण्यात आले नाहीत. मात्र, हे चित्रपट पुन्हा एकदा लांबणीवर पडले असून ते 2021 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे समजते.

दरम्यान, या दोन्ही चित्रपटांची निर्मिती ही रिलायन्स एंटरटेन्मेंटने केली आहे. या कंपनीने गेल्या जुलैमध्ये सूर्यवंशी आणि 83 हे चित्रपट थिएटरमध्येच रीलिज केले जातील, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळी तर 83 हा चित्रपट ख्रिसमसदरम्यान प्रदर्शित करण्यात येईल, असे ऑक्टोबरमध्ये सांगण्यात आले होते. 

रिलायन्स एंटरटेन्मेंट ग्रुपचे सीईओ एस. सरकार यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 83 व सूर्यवंशी हे दोन्ही चित्रपट 2021 मध्येच रीलिज केले जातील. याचे कारण कोव्हिड 19 च्या संभाव्य दुसर्‍या लाटेची शक्यता. 83 हा चित्रपट जानेवारी तर सूर्यवंशी हा चित्रपट मार्चमध्ये रीलिज करण्याच्या विचारात आहोत, असे सरकार यांनी सांगितले.

अक्षय कुमार स्टारर ‘सूर्यवंशी’ हा रोहित शेट्टी यांचा कॉप युनिव्हर्सचा पुढील चित्रपट आहे. तर ‘83’ हा चित्रपट 1983 मध्ये वर्ल्डकप विजेतेपदावर आधारित आहे.

Back to top button