डेन्मार्क ठार मारणार 1.70 कोटी उंदरांना | पुढारी

डेन्मार्क ठार मारणार 1.70 कोटी उंदरांना

कोपेनहेगन : जनावरांमध्ये आढळणार्‍या कोरोना व्हायरसच्या संसर्गात झालेल्या बदलांमुळे डेन्मार्कमध्ये सुमारे एक कोटी 70 लाख उंदरांना ठार मारण्याची योजना तयार करण्यात येत आहे. लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर डेन्मार्क सरकार तेथील उंदरांनाही ठार मारण्याच्या विचारात आहे.

डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी सांगितले की, आमच्या आरोग्य अधिकार्‍यांना माणसात आणि उंदरांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. ही लक्षणे अँटिबॉडीबाबत असलेल्या संवेदनशीलतेवर परिणाम करू शकतात. जनतेबाबत आमच्याजवळ मोठी जबाबदारी आहे. याबरोबरच उर्वरित जगाप्रतीही आमची जबाबदारी वाढते.

डेन्मार्कमध्ये कोरोनाबाबत एक संशोधन करण्यात आले आहे. यासंबंधीचा अहवाल जागतिक आरोग्य संघटना आणि युरोपीय सेंटर फॉर डिसिज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलला सादर करण्यात आला. हा अहवाल देशातील सिरम संस्था व संसर्गजन्य रोगांशी लढणार्‍या डॅनिश अ‍ॅथॉरिटीच्या वतीने प्रयोगशाळेतील चाचण्यांवर आधारित आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित असलेले माईक रेयॉन यांनी सांगितले की, चीनमध्ये कोरोना संक्रमित उंदरांमधून हा व्हायरस मानवात पसरला. तर दुसर्‍या अधिकार्‍याने सांगितले की, उंदरातील कोरोना व्हायरसचा काही लोकांना संसर्ग झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. यामध्ये काही अनुवांशिक बदल झाले. आहेत. यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून डेन्मार्कमध्ये उंदरांना ठार मारण्याचा विचार पुढे येऊ लागला आहे.

Back to top button