केवळ दगडांचा पाऊस पडणार्‍या ग्रहाचा शोध | पुढारी

केवळ दगडांचा पाऊस पडणार्‍या ग्रहाचा शोध

लंडन : ज्यावेळी आपल्याला एखाद्या ठिकाणी फारच त्रास होत असेल तर त्या जागेला आपण ‘नरक’ असे म्हणतो. खगोलशास्त्रज्ञांनी ब्रह्मांडात अशा एका ग्रहाचा शोध लावला आहे की, त्या ग्रहाला लोक आता ‘नरक’ म्हणू लागले आहेत.

ग्रहाला नरक म्हणण्यास अनेक कारणे कारणीभूत आहे. या ग्रहावर सदानकदा तप्‍त लाव्हारस वाहत असतो. यामुळे तेथे लाव्हाचे महासागर बनले आहेत. याशिवाय तेथे पाण्याचा नव्हे तर चक्‍क मोठमोठ्या दगडांचा पाऊस पडतो. पृथ्वीपासून शेकडो प्रकाशवर्षे दूर अंतरावर ‘के 2141 बी’ नामक ग्रह आहे. हा ग्रह प्रचंड उष्ण आहे.  तसेच तेथे लाव्हाचे महासागर असून सुपरसॉनिक विमानाच्या वेगाने वारे वाहत असतात. याशिवाय पाऊस म्हणजे आकाशातून दगडांचा वर्षाव होत असतो. शास्त्रज्ञांना असा प्रतिकूल स्थितीतील आणि नरकासारखा ग्रह यापूर्वी दुसरा कुठलाच ग्रह आढळून आला नव्हता.

‘मंथली नोटिसिस ऑफ द रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील माहितीनुसार नरकासारखा हा ग्रह आपल्या तार्‍याच्या अगदी जवळ आहे. यामुळे तेथे प्रचंड तापमान असल्याने लाव्हाचे महासागर आढळतात. या ग्रहाचे वातावरणही अजब प्रकारचे आहे. या वातावरणात प्रामुख्याने दगडच तरंगताना आढळून येतात. यामुळे येथील जमीन आणि वातावरण हे दगडांनीच तयार झाले आहे. या ग्रहाचा शोध अत्यंत अत्याधुनिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘जेम्स वेब’ टेलिस्कोपने करण्यात आला आहे.

Back to top button