१४१ रुपयांसाठी खर्च केले तब्बल ४२ हजार  | पुढारी

१४१ रुपयांसाठी खर्च केले तब्बल ४२ हजार 

तैपेई : अनेकवेळा एखाद्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांना फारच प्रयत्न करावे लागतात. याचाच प्रत्यय तैवानमध्ये आला. येथे 141 रुपयांच्या दह्याची चोरी करणार्‍या चोराला पकडण्यासाठी पोलिसांना कसून प्रयत्न करण्याबरोबरच तब्बल 42 हजार रुपये खर्च करावे लागले. तैवानची राजधानी तैपेईमध्ये ही विचित्र घटना घडली आहे. 

तैपेईमध्ये चायनिज कल्चर युनिव्हर्सिटीमध्ये शिकणार्‍या पाच विद्यार्थिनी एकाच फ्लॅटमध्ये राहात होत्या. यामुळे त्या एकच फ्रीजही शेअर करत होत्या. त्यातील एका विद्यार्थिनीने 141 रुपये किमतीची दह्याची बाटली फ्रीजमध्ये ठेवली होती. मात्र, ही बाटली अचानक फ्रीजमधून नाहीशी झाली. तिने आपल्या सोबतच्या सर्व विद्यार्थिनींना बाटलीबाबत विचारले. मात्र, काहीच सुगावा लागू शकला नाही. यामुळे दहीबाटली चोराला पकडण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दह्याची बाटली चोरणार्‍या चोरास पकडण्यासाठी प्राथमिक चौकशी केली. मात्र, यातून काहीच निष्पन्‍न झाले नाही. यामुळे या किरकोळ चोरीचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेतली. या टीमने तक्रार करणार्‍या विद्यार्थिनीसह पाच जणींचीही डीएनए टेस्ट घेतली. दह्याची बाटली होती 141 रुपयांची; पण पोलिसांनी खर्च केले तब्बल 41,500 रुपये. पोलिसांच्या या कारवाईची सोशल मीडियावर हुर्यो उडविण्यात येत आहे. या किरकोळ चोरीच्या चौकशीसाठी जनतेचा पैसा अकारण खर्च केल्याचा आरोप तेथील लोक करत आहे. मात्र, चोर सापडला की नाही हे समजू शकले नाही.

Back to top button