या महिलेला ऐकू येत नाही केवळ पुरुषांचाच आवाज | पुढारी

या महिलेला ऐकू येत नाही केवळ पुरुषांचाच आवाज

बीजिंग : ऐकण्यात समस्या निर्माण होणे म्हणजे यास बहिरेपण असे म्हणतात. मात्र, यामध्ये केवळ पुरुषांचा आवाज ऐकू न येणे हा कसला आजार असेल? असा प्रश्‍न उपस्थित होतो. तसे पाहिल्यास ज्या देशांमध्ये तणावाचे काम जास्त असते, तेथे हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र, चीनमध्ये एका महिलेला बहिरेपणाचा असा एक वेगळा आजार जडला आहे की, तिला आवाज तर ऐकू येतो; पण केवळ पुरुषांचाच आवाज ऐकू येत नाही.

बहिरेपणाच्या आजारांमध्ये सर्व प्रकारचे आवाज ऐकण्याची कानाची क्षमता कमी झालेली असते. मात्र, चिनी महिला इतर सर्व आवाज ऐकू शकते; पण ती केवळ पुरुषांचे आवाज ऐकू शकत नाही. यासंदर्भात बोलताना या महिलेने सांगितले की, रात्रीच्या वेळी झोपलेली असताना अचानक कानात मोठमोठ्याने आवाज घुमल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर उलट्या झाल्या आणि ऐकण्याची क्षमता कमी झाली. तिने डॉक्टरला सांगितले की, मला लो फ्रिक्‍वेन्सी आवाज ऐकू येत नाही. दरम्यान, यासंदर्भात बोलताना सांगितले की, अशा प्रकारचे बहिरेपण तात्कालिक असते. पुरुषांचा आवाज हा लो-फ्रिक्‍वेन्सीचा तर महिलांचा आवाज हाय-फ्रिक्‍वेन्सीचा असतो. याच कारणामुळे या महिलेला पुरुषांचा नाही तर केवळ महिलांचा आवाज ऐकू येतो. अशा प्रकारच्या आजारावर नेमका कोणता उपचार करावयाचा, असा प्रश्‍न सध्या डॉक्टरांना पडला आहे.

Back to top button