या देशात रंगते रडण्याची स्पर्धा | पुढारी

या देशात रंगते रडण्याची स्पर्धा

मेक्सिको : जगभरात सातत्याने अनेक स्पर्धा होत असतात. मग त्या खेळाच्या किंवा खाण्याच्या अथवा अन्य कोणत्याही असू शकतात. मात्र, तुम्हाला रडण्याच्या स्पर्धेबद्दल माहीत आहे का? होय अशी एक अनोखी स्पर्धा मेक्सिकोमध्ये रंगते. या स्पर्धेतील विजेत्याचा बक्षीसही मिळते.

रडण्याची स्पर्धा मेक्सिकोमध्ये दरवर्षी एक नोव्हेंबरला आयोजित केली जाते. या दिवशी तेथे ‘द डे ऑफ द डेड’ नामक सण साजरा केला जातो. यादिवशी लोक आपल्या पूर्वजांच्या कबरीवर जातात. त्या कबरींना सजवतात. याशिवाय मृत पूर्वजांच्या आवडीचे पदार्थही तेथे ठेवले जातात. पूर्वजांची आठवण असावी आणि त्यांच्या आठवणीखातर किमान दोन अश्रू तरी ठळावेत, म्हणून ही स्पर्धा आयोजित केली जाते. चांगले रडणार्‍या स्पर्धकाला विजेता घोषित करून त्याला बक्षीसही प्रदान केले जाते. मात्र, कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदा या सणावरही परिणाम झाला. कारण कोरोनामुळे तेथील तेथील सर्वकाही बंद करण्यात आले आहे. यामुळे लोक आपल्या पूर्वजांच्या कबरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत व त्यांच्या स्मरणार्थ रडून मनही मोकळे करू शकले नाहीत. मेक्सिकोमध्ये आयोजित होणार्‍या या स्पर्धेत भाग घेणार्‍या स्पर्धकांना लाईव्ह परफॉर्म करावे लागते. मात्र, यंदा ही स्पर्धा व्हर्च्युअल घेण्यात आली आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट प्रवेशिका आल्या होत्या.

Back to top button