तुरुंगात राहून मिळवल्या ३१ पदव्या! | पुढारी | पुढारी

तुरुंगात राहून मिळवल्या ३१ पदव्या! | पुढारी

अहमदाबाद : येथील भानुभाई पटेल यांनी तुरुंगवासात असतानाच आठ वर्षांच्या काळात 31 पदव्या संपादन केल्या आहेत. तुरुंगातून सुटल्यावर त्यांना सरकारी नोकरीही मिळाली. त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक, एशिया बुक, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये झाली आहे.

भानुभाई पटेल मूळचे महुवा येथील आहेत. अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतल्यावर ते पुढील शिक्षणासाठी 1992 मध्ये अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांचा एक मित्र स्टुडंट व्हिसावर अमेरिकेत नोकरी करून आपला पगार त्यांच्या खात्यावर ट्रान्स्फर करीत असत. त्यामुळे त्यांच्यावर फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन अ‍ॅक्ट (फेरा) कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप ठेवण्यात आला व वयाच्या 50 व्या वर्षी त्यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यावर त्यांना आंबेडकर युनिव्हर्सिटीमधील नोकरीची ऑफर मिळाली. विशेष म्हणजे तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नाही. मात्र, भानुभाई पटेल यांची शैक्षणिक पात्रता पाहून ही नोकरी देऊ करण्यात आली. नोकरीनंतर पाच वर्षांच्या काळात त्यांनी आणखी 23 पदव्या मिळवल्या. अशा प्रकारे आतापर्यंत त्यांच्या नावे 54 पदव्या झाल्या आहेत. सध्या 65 वर्षांचे असलेल्या भानुभाई यांनी इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत तीन पुस्तकेही लिहिली आहेत.

Back to top button