लंडन : पाचवेळा दिला मृत्यूला चकवा! | पुढारी

लंडन : पाचवेळा दिला मृत्यूला चकवा!

लंडन :

काहीवेळा मृत घोषित केलेल्या व्यक्‍ती नंतर उठून बसल्याचीही उदाहरणे जगभरात आहेत. एक महिला तर अशी आहे जिने अशाप्रकारे एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल पाचवेळा मृत्यूला चकवा दिला आहे. 36 वर्षांच्या या महिलेचे नाव आहे एमिली एसर.2017 मध्ये बागेत काम करीत असताना गॅस कॅनच्या स्फोटात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यावेळी ती 35 टक्क्यांपर्यंत भाजली होती. तिला चार महिने हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. गळ्यापासून खाली सर्व शरीर जणू काही वितळून गेले होते. तिच्यावर 35 शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. इंडियानामध्ये राहणारी एमिली आधी एक व्यावसायिक हेअर स्टायलिस्ट होती. मेकअप आर्टिस्ट म्हणूनही तिने नाव कमावले होते. या दुर्घटनेने तिचे आयुष्य बदलून गेले. तिला नव्याने चालणे, बोलणे आणि खाणे शिकावे लागले. विशेष म्हणजे पाचवेळा तिचा श्‍वास थांबला होता. मात्र, प्रत्येक वेळी तिने मृत्यूवर मात करून जीवनाला नव्याने कवटाळले. या दुर्घटनेने आपण खचलो नसून आणखी मजबूत झालो आहे असे तिने म्हटले आहे. 

Back to top button