चोवीस कॅरेट सोन्याचा वर्ख असलेली मिठाई! | पुढारी

चोवीस कॅरेट सोन्याचा वर्ख असलेली मिठाई!

मुंबई :

वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्याची तयारी राजसी थाटातच होत असते. दिवाळी आणि गोडधोड यांचे एक अतूट समीकरण आहे. मात्र, सोन्याचा वर्ख असलेली मिठाई म्हणजे सर्वांच्याच कुतुहलाचा विषय ठरू शकतो. अमरावती शहरात अशा प्रकारची मिठाई करण्यात आली आहे. ‘सोनेरी भोग’ नावाच्या या मिठाईवर 24 कॅरेट अस्सल सोन्याचा वर्ख आहे. या मिठाईचा दर प्रतिकिलो तब्बल सात हजार रुपये आहे!

रघुवीर मिठाईयां यांनी ही मिठाई बनवली आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये अनोखी मिठाई ग्राहकांसमोर आणण्याची त्यांची परंपरा आहे. यापूर्वी त्यांनी गोल्ड बिस्किटे, सोनेरी पान बनवले होते. यावेळी अस्सल सोन्याचा ‘मुलामा’ असलेली ही मिठाई आणली आहे. या मिठाईमध्ये मामरा बदाम, पिस्ता आणि केशराचा वापर करण्यात आला आहे. एक किलो मिठाईमध्ये सुमारे एक ग्रॅम 24 कॅरेट सोने वापरले आहे. ही मिठाई राजस्थानी बल्‍लवाचार्य बनवत आहेत. गुजरातमध्येही अशी सोन्याचा वर्ख असलेली मिठाई बनवली जाते. ‘सोनेरी भोग’ मिठाईसाठी वापरण्यात येणारे 24 कॅरेट सोन्याचे वर्ख हे नोएडाहून आणण्यात आले आहे.

Back to top button