ग्रीनलँडमध्ये बर्फाखाली प्राचीन सरोवर | पुढारी | पुढारी

ग्रीनलँडमध्ये बर्फाखाली प्राचीन सरोवर | पुढारी

वॉशिंग्टन :

ग्रीनलँडमध्ये एक मैलापेक्षाही अधिक परिसरात पसरलेल्या बर्फाच्या जाड थराखाली एक प्राचीन सरोवर असल्याचे आढळून आले आहे. ग्रीनलँडमध्ये भूतकाळात असलेल्या हवामानाबाबतची रहस्ये या सरोवरात दडलेली असल्याचे अमेरिकेतील संशोधकांनी म्हटले आहे.

ग्रीनलँडचा वायव्येकडील भाग ज्या काळी बर्फमुक्‍त होता त्या काळात हे सरोवर अस्तित्वात होते. लाखो वर्षांपूर्वी अशी स्थिती त्याठिकाणी होती. सध्या आर्क्टिक वर्तुळातील बर्फ वेगाने वितळत चालले आहे. उत्तर ध—ुवाचे भविष्यातील चित्र कसे असेल याचा अंदाजही या प्राचीन सरोवराच्या अभ्यासातून व्यक्‍त करता येऊ शकेल. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील गाय पॅक्समन यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, हे प्राचीन सरोवर जुन्या काळातील माहितीचा एक उत्तम स्रोत बनू शकते. ग्रीनलँडमधील बर्फाच्या आच्छादनाची भूतकाळातील स्थिती कशी होती हे यामधून समजू शकेल. पॅक्समन व त्यांच्या सहकार्‍यांनी रडारचा वापर करून बर्फाच्या स्तराखाली असलेल्या या सरोवराचा शोध घेतला आहे.

Back to top button