‘वुई कॅन बी हिरो’चा फर्स्ट लूक! | पुढारी

‘वुई कॅन बी हिरो’चा फर्स्ट लूक!

मुंबई : प्रियांका चोप्राने आपला दुसरा नेटफ्लिक्स ओरिजिनल प्रोजेक्ट ‘वुई कॅन बी हिरोज’चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यामध्ये ती एका लेडी बॉसच्या भूमिकेत आहे. हा एक लहान मुलांसाठीचा चित्रपट आहे. प्रियांका दीर्घकाळापासून ‘युनिसेफ’च्या माध्यमातून लहान मुलांसाठी काम करीत आली आहे हे याठिकाणी लक्षणीय आहे!

‘वुई कॅन बी हिरोज’ या चिल्ड्रेन मुव्हीचे दिग्दर्शन रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी केले आहे. सर्व सुपरहिरोंचे एलियन म्हणजेच परग्रहवासी अपहरण करतात व त्यांना परत आणण्यासाठी साहसी मुलं एकत्र येतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. प्रियांकाने या चित्रपटातील आपला लूक प्रसिद्ध करून म्हटले आहे की ‘वूऽऽऽहू! फायनली हा आहे…वुई कॅन बी हिरोजचा फर्स्ट लूक. त्याचे दिग्दर्शन प्रतिभाशाली रॉबर्ट रॉड्रिग्जने केले असून हा चित्रपट नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नेटफ्लिक्सवर येत आहे. ही एक किड्स क्लासिक मुव्ही आहे. रॉबर्ट असे चित्रपट नेहमी बनवत असतात. मी माझ्या पात्राची गुंतागुंतीची दुनिया तुम्हाला दाखवण्यासाठी उत्सुक आहे. लवकरच सांगेन…!’ या चित्रपटात प्रियांकाबरोबर क्रिस्टीन स्लेटर, गागा गोसलिन, अकिरा अकबर, अँड्र्यू डियाज, अँडी वॉकन, बॉयड होलब—ुक आदी कलाकार आहेत. प्रियांकाच्या आगामी चित्रपटांमध्ये अरविंद अडिगा यांच्या कादंबरीवर आधारित ‘द व्हाईट टायगर’चा समावेश आहे.

Back to top button