नादुरुस्त झाल्याने जाळून टाकली दहा कोटींची कार! | पुढारी

नादुरुस्त झाल्याने जाळून टाकली दहा कोटींची कार!

मॉस्को : रशियातील एका सोशल मीडिया स्टारने आपली सव्वा कोटी रुपयांची लक्झरी कार जाळून टाकली. कार नादुरुस्त झाल्याने त्याने हे कृत्य केले व त्याचा व्हिडीओही बनवला. मिखाईल लिटविन असे या प्रसिद्ध यूट्यूबरचे नाव आहे. 

या माणसाने ही महागडी कार केवळ पंधरा हजार किलोमीटरच चालवली होती. मात्र, या कारमध्ये सतत काही तरी बिघाड होत होता. गेल्या दहा महिन्यांमध्ये त्याने ही कार अनेक वेळा दुरुस्तीसाठी दिली होती. मात्र, तरीही या कारमध्ये समस्या येत असल्याने त्याने रागाच्या भरात ती जाळून टाकली. त्याबाबतचा व्हिडीओ पाहून अनेक लोकांना हा त्याचा पब्लिसिटी स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याने असे कृत्य केल्याचा संशय अनेकांनी व्यक्‍त केला आहे. मिखाईलचे यूट्यूबवर सुमारे 50 लाख सब्सक्रायबर आहेत. कार जाळल्याचा व्हिडीओे शेअर करीत असताना त्याने लिहिले आहे की या ‘शार्क’बाबत काय करायचा याचा मी खूप विचार केला…माझ्यासाठी आग हा चांगला उपाय होता. मी खूश नाही!

Back to top button