फुंकून खाऊ नये गरम खाणे  | पुढारी

फुंकून खाऊ नये गरम खाणे 

नवी दिल्ली :

गरम असलेले खाणे लोक फुंकून फुंकून खात असल्याचे तुम्ही सातत्याने पाहिले असणार. जर तुम्हीही असे करत असाल तर आताच सावधान होण्याची गरज असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. लोक आपल्या लहान मुलांना गरम खाणे फुंकून ते गार करून भरवतात. असे केल्याने मुलाचे तोंड पोळणार नाही, असा चांगला उद्देश असला तरी याचा त्या मुलाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कधी कधी आपणसुद्धा गरम असलेले खाणे फुंकून गार करून खाण्याचा प्रयत्न करत असतो. असे केल्याने मुलांच्या आरोग्यासाठी जितके नुकसानकारक ठरते, तितकेच तुमच्यासाठीही. मग गरम खाणे फुंकून खाल्ल्याने नेमके होते तरी काय, असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो. 

ज्यावेळी खाणे गरम असते त्यावेळी ते गार करण्यासाठी आपण फुंकर मारत असतो. त्यावेळी तोंडात असलेले बॅक्टेरिया आपल्या किंवा ज्याला भरवत असतो, त्याच्या तोंडात जातात. यामुळे खाणे खाणार्‍याच्या दातांमध्ये कॅव्हिटी होण्याची शक्यता बळावते. यामुळेच खाणे अथवा जेवण जर गरम असेल तर ते गार करण्यासाठी फुंकर न मारता ते तसेच गार करण्यासाठी थोडा वेळ थांबावे. जर आपल्याला वेळ कमी असेल तर गरम खाणे फॅनखाली थोडावेळ ठेवावे. यामुळे खाणे तातडीने खाण्यायोग्य थंड होईल आणि यामुळे आरोग्यासाठी कसलीच समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावणार नाही.

Back to top button