सारा झळकणार ‘कुली नंबर वन’मध्ये | पुढारी

सारा झळकणार ‘कुली नंबर वन’मध्ये

नवी दिल्ली :

बॉलीवूडमध्येही सध्या कोरोनासंबंधीचे नियम पाळून धडाक्यात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. यानिमित्तची अनेक सेलिब्रिटी आपली छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशीच छायाचित्रे अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या छायाचित्रांवरून सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या छायाचित्रांमध्ये साराने पर्पल आणि गोल्डन कलरचा ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती फारच क्यूट आणि सुंदर दिसत आहे. चाहते ही छायाचित्रे पसंत करून साराचे कौतुकही करत आहेत. यामुळे ही छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत 

आहेत. सारा आता लवकरच ‘कुली नंबर वन’ या चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेत्री सारा अली खानने ही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. तिने लिहिले आहे की, दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना खूप आनंद, चांगले आरोग्य, धन आणि समृद्धी मिळो, अशी शुभेच्छाही व्यक्‍त केली आहे.

इन्स्टाग्रामवर ही छायाचित्रे शेअर करताच काही तासातच तब्बल 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. या छायाचित्रांशिवाय साराने काही दिवसांपूर्वी वरुण धवनसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये दोघेही ‘नॉक नॉक गेम’ खेळताना दिसत होते. हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता.

दरम्यान, साराच्या वर्कफ्रंटची चर्चा करावयाची झाल्यास ही अभिनेत्री लवकरच ‘कुली नंबर वन’मध्ये दिसणार आहे. यामध्ये सारा ही बॉलीवूड अ‍ॅक्टरवरून धवनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या डिसेंबरमध्ये रीलिज होण्याची शक्यता आहे. याशिवाय सारा आता अक्षय कुमार आणि धनुष्यसोबत ‘अंतरंगी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. यातील भूमिकेबद्दल तिला ‘बेस्ट डेब्यू अ‍ॅक्ट्रेस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Back to top button