मंडला चित्रशैलीत शंभर पेंटिंग बनवण्याचा विक्रम | पुढारी

मंडला चित्रशैलीत शंभर पेंटिंग बनवण्याचा विक्रम

कोच्ची : केरळमधील 21 वर्षांच्या अथिरा सासी नावाच्या तरुणीने मंडला चित्रशैलीत शंभर पेंटिंग बनवण्याचा विक्रम केला आहे. अलपुज्जाच्या मन्नार येथे राहणार्‍या अथिराची याबाबत एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्, इंडिया बुक आणि कलाम वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. 

अथिराने मंडला पेंटिंग करण्याची कला स्वतःच शिकली होती. ही चित्रशैली दक्षिण तसेच दक्षिण-पूर्व आशियात अधिक प्रचलित आहे. त्यामध्ये तिबेट, भूतान, म्यानमारचा समावेश होतो. भारतात गुजरात, मध्य प्रदेश आणि अन्य काही राज्यांमध्ये ही कलाशैली आढळून येते. बिहारमधील मधुबनी किंवा महाराष्ट्रातील वारली चित्रशैली जशी प्रसिद्ध आहे तशीच ही चित्रशैलीही प्रसिद्ध आहे. अथिराने सांगितले, माझे लहानपण गुजरातमध्ये गेले. तिथे या चित्रशैलीचा वापर टेक्स्टाईल प्रिंटिंगमध्ये केला जात होता. तिथे मी ही कला पाहिली व नंतर मन्नारमध्ये आल्यावर या चित्रशैलीत पेंटिंग बनवण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून शंभर पेंटिंग तयार केली.

 

Back to top button