‘या’ मुलीला पाणी, घाम आणि अश्रूंचीही अ‍ॅलर्जी! | पुढारी

‘या’ मुलीला पाणी, घाम आणि अश्रूंचीही अ‍ॅलर्जी!

वॉशिंग्टन :

कुणाला कशाची अ‍ॅलर्जी असेल हे काही सांगता येत नाही. मात्र, अमेरिकेतील एका मुलीला असलेली अ‍ॅलर्जी तिला दैनंदिन जीवन जगण्यासही अडथळा आणणारी आहे. या मुलीला चक्‍क पाण्याची अ‍ॅलर्जी आहे. केवळ पाणीच नव्हे तर तिला घाम व अश्रूंमुळेही त्रास होतो. एरव्ही आपण पाण्याला ‘जीवन’ म्हणत असतो; पण या मुलीबाबत पाणी हे ‘मृत्यू’ ठरू शकते!

या मुलीचे नाव आहे डेनिअल मेक्रकेवेन. तिला नळातील, बाटलीतील पाण्याबरोबरच खार्‍या पाण्याचीही अ‍ॅलर्जी आहे. स्वतःचा घाम आणि अश्रूही तिला सहन होत नाहीत. घाम आणि अश्रू येताच तिच्या त्वचेला खाज सुटते. या मुलीला दुर्मीळ असा ‘अ‍ॅक्‍वाजेनिक युर्टिसेरिया’ नावाचा आजार आहे. ही पाण्यामुळे होणारी दुर्मीळ अशी अ‍ॅलर्जी आहे. अशी अ‍ॅलर्जी असणारे जगभरात शंभरपेक्षाही कमी लोक आहेत. तिच्या डोळ्यांमधून अश्रू आले व तिच्या त्वचेला खाज सुटली त्यावेळी आम्हाला तिच्या अ‍ॅलर्जीबाबत समजले असे तिच्या आईने सांगितले. ज्यावेळी तिची त्वचा पाण्याच्या संपर्कात येते त्यावेळी त्वचेवर व—ण तयार होतात. तिच्यासाठी बादलीभर पाण्याने आंघोळ करणेही कठीण जाते. त्यामुळे आंघोळीवेळीही ती नीट खबरदारी घेत असते.

Back to top button