केवळ 8 टक्के लोकसंख्या बाधित झाल्यावरही ‘हर्ड इम्यनिटी’? | पुढारी

केवळ 8 टक्के लोकसंख्या बाधित झाल्यावरही ‘हर्ड इम्यनिटी’?

बर्लिन ः ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होण्यासाठी 60 ते 80 टक्के लोकसंख्येला विशिष्ट आजाराने बाधित होणे व या लोकांनी त्यावर मात करणे गरजेचे असते. मात्र, प्रचंड वैविध्य असलेल्या लोकसंख्येत केवळ 8 टक्के लोक बाधित होऊन बरे झाले तरी ‘हर्ड इम्युनिटी’ विकसित होऊ शकते असे जर्मनीच्या संशोधकांनी म्हटले आहे. 

जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी एका मॉडेलचा वापर करून याबाबतचे अनुमान व्यक्‍त केले आहे. भारतासारख्या लोकसंख्येतील मोठेच वैविध्य असलेल्या देशासाठी हे संशोधन दिलासादायक आहे. सध्याच्या कोरोना महामारीबाबतही असे मानले जाते की लोकसंख्येचा मोठा हिस्सा संक्रमित होऊन तो त्यामधून बाहेर पडला की ‘हर्ड इम्युनिटी’ विकसित होईल व जे लोक या विषाणूने संक्रमित झालेले नाहीत त्यांचेही अप्रत्यक्षरीत्या संरक्षण होईल. लोकसंख्येत सर्व लोक एकसारखे असतात या समजुतीवर आधारित हे संशोधन आहे. अर्थातच तसे असत नाही. आर्थिक स्तर, राहणीमान, शिक्षण, रोगप्रतिकारक क्षमता, जागरूकता व अन्यही अनेक गोष्टींचे वैविध्य असते. असे वैविध्य विशेषतः भारतात अधिक मोठ्या प्रमाणात आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी म्हटले आहे की याठिकाणी लोकसंख्येत विषमता आणि वैविध्य असते तेथील लोक सर्वात आधी व वेगाने संक्रमित होतील. तिथे संक्रमण वेगाने महामारीचे रूप घेईल. मात्र, तितक्याच वेगाने लोक रोगमुक्‍तही होतील. त्यामुळे अन्य असंक्रमित लोकसंख्येत ‘हर्ड इम्युनिटी’चा लाभ मिळू लागेल. वैविध्यपूर्ण लोकसंख्येत 8 टक्के लोकसंख्या संक्रमित झाल्यावरही अशी इम्युनिटी शक्य आहे. लोकसंख्या 31.2 लाख असेल तर 25 हजार लोक संक्रमित होऊन बरे झाल्यास तिथे ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होईल.

Back to top button