आयर्लंडमध्ये का सापडत नाहीत साप? | पुढारी

आयर्लंडमध्ये का सापडत नाहीत साप?

लंडन : जगाच्या पाठीवर सर्वत्र साप आढळतात असाच आपला समज असतो. एक बेट तर असे आहे जे ‘स्नेक आयलंड’ म्हणूनच ओळखले जाते व तिथे अक्षरशः पावलापावलावर साप आढळतात. ब्राझील या देशात साप मोठ्या संख्येने आढळतात. मात्र, जगाच्या पाठीवर एक देश असा आहे जिथे साप आढळत नाहीत. हा देश म्हणजे आयर्लंड! आयर्लंड या थंड देशात साप का आढळत नाहीत याचे अनेकांना कुतुहल वाटू शकते.

आयर्लंडमध्ये मानव वसाहत ईसवी सनापूर्वी 12800 वर्षांपासून असल्याचे पुरावे आढळलेले आहेत. मात्र, याठिकाणी साप आढळल्याचा एकही उल्लेख आढळत नाही. संशोधकांच्या मते, आयर्लंडमध्ये कधीच सापांचे अस्तित्व नव्हते. जीवाश्म अभिलेख विभागातही तेथील सापांची कोणतीही नोंद नाही. याबाबत असेही म्हटले जाते की एके काळी तिथेही साप होते; मात्र अत्याधिक थंडीमुळे ते हळूहळू लुप्त होत गेले. आताही तिथे साप नसण्याचे हेच कारण मानले जाते. अत्यंत थंड हवामान असलेल्या या देशात सापांना आपले अस्तित्व टिकवता आले नाही.

 

Back to top button