अनुमानापेक्षा अधिक जवळ आहे कृष्णविवर | पुढारी

अनुमानापेक्षा अधिक जवळ आहे कृष्णविवर

टोकियो : एखाद्या तार्‍याचा ‘सुपरनोव्हा’ हा विस्फोट होऊन मृत्यू होतो त्यावेळी त्याचे रूपांतर प्रचंड आकर्षणशक्ती असलेल्या कृष्णविवरात होते. प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी असा एक कृष्णविवर असतो. आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या मध्यभागीही ‘सॅजिटेरियस ए’ नावाचे कृष्णविवर आहे. ते पृथ्वीपासून अनुमानापेक्षाही अधिक जवळ असल्याचे आढळले आहे.

हे एक सुपरमॅसिव्ह म्हणजे अतिशय शक्तिशाली कृष्णविवर आहे. ते आपल्या सौरमंडळातील सूर्यापेक्षा 40 लाख पटीने अधिक मोठे आहे. आधीच्या अनुमानापेक्षा हे कृष्णविवर पृथ्वीपासून 2 हजार प्रकाशवर्ष अधिक जवळ आहे. अर्थातच त्याच्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही. हे कृष्णविवर पृथ्वीच्या दिशेने वाढलेले नसून त्याच्यापासूनच्या अंतराची अधिक अचूक माहिती आता मिळालेली आहे. त्यामुळे हे अंतर घटले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जपानमधील एक रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी प्रोजेक्ट ‘व्हेरा’ याबाबतचे संशोधन करीत आहे. इंटरफेरोमेट्रीच्या तंत्राने ‘व्हेरा’ने जपानमधील दुर्बिणींकडून डेटा गोळा केला आणि त्याला सध्याच्या डेटाशी एकत्र करून ‘मिल्की वे’चा अधिक अचूक नकाशा बनवला. त्यामुळे ‘मिल्की वे’च्या मध्यभागी असलेल्या या कृष्णविवरापासून पृथ्वीचे अंतर अधिक अचूकरीत्या समजले. हे कृष्णविवर पृथ्वीपासून 25,800 प्रकाशवर्ष अंतरावर आहे.

 

Back to top button