स्टीलपेक्षा पाच पट मजबूत पोशाख | पुढारी

स्टीलपेक्षा पाच पट मजबूत पोशाख

टोकियो : कोळ्याचे जाळे अतिशय चिवट आणि मजबूत असते. त्यापासून प्रेरणा घेऊन आता एका जपानी स्टार्टअपने स्टीलपेक्षाही पाच पट मजबूत पोशाख बनवला आहे. कोळ्याच्या तंतूची प्रतिकृती बनवून ‘स्पायबर’ नावाच्या या स्टार्टअपने हा पोशाख तयार केला. ‘स्पायबर’चे बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख केंजी हिगाशी यांनी म्हटले आहे की, रेशमाचे किडे तरल प्रोटिनला रेशमात घुसळून जाळे तयार करतात.

रेशीम किड्यांचे हजारो वर्षांपासून रेशीम उत्पादनासाठी पालन केले जाते. मात्र कोळी कीटक आपल्याच प्रजातीच्या इतर जीवांना भक्ष्य बनवते. त्यामुळे त्यांचे पालन करणे अशक्य आहे. स्पायबरच्या संस्थापकांनी कोळ्याच्या तंतूसारखे कृत्रिम तंतू विकसित करण्याचे ठरवले. काजुहाइड सेकियामा व जुनिची सुगहारा यांनी 2004 मध्ये यामागाटा प्रांतात किओ विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून सर्वप्रथम हा प्रयोग केला होता. त्यानंतर दोघांनी 2007 मध्ये कंपनीची स्थापना केली व अशा प्रकारचे मजबूत कापड विकसित केले.

Back to top button