‘हीट डेथ’ नंतर होईल ब्रह्मांडाचा विनाश | पुढारी

‘हीट डेथ’ नंतर होईल ब्रह्मांडाचा विनाश

वॉशिंग्टन ः या नाम-रूपाच्या दुनियेत प्रत्येक गोष्टीला अंत आहे. अब्जावधी वर्षांचे आयुष्य असलेले ग्रह व तारेही एक दिवस नष्ट होतात. अशा अनेक ग्रह-तार्‍यांच्या अनेक आकाशगंगा असलेले ब—ह्मांडही नष्ट होऊन जाईल. त्याचा विनाश कसा होईल याबाबत अनेक सिद्धांत सांगितले जातात. पार्टिकल फिजिसिस्ट आणि कॉस्मॉलॉजिस्ट ब—ायन कॉक्स यांनीही एक सिद्धांत मांडलेला आहे. त्यानुसार ब—ह्मांडाचा अंत भयानक अंधःकारानंतर होईल. त्यालाच ‘हीट डेथ’ किंवा ‘बिग फ्रीज’ म्हटले जाईल.

‘हीट डेथ’ म्हणजे उष्णता व प्रकाश यांचा अभाव. ही स्थिती येईपर्यंत ब—ह्मांडाचा अब्जावधी वर्षांपर्यंत विस्तार होत जाईल. या काळात तारे व आकाशगंगांमधील अंतर वाढत जाईल. अनेक तार्‍यांचे त्यांच्या ग्रहांपासूनचे अंतरही वाढत जाईल. त्यामुळे पृथ्वीसारख्या ग्रहांपर्यंत तार्‍यांचा प्रकाश व उष्णता मिळणे कमी होईल. एक वेळ अशी येईल की नवे तारे बनण्याची प्रक्रिया थांबेल व अस्तित्वात असलेले तारेही नष्ट होऊन जातील. ब—ह्मांड कमाल एंट्रोपीच्या स्थितीत जाईल व त्यावेळी सर्व ऊर्जा ज्याठिकाणी कमी ऊर्जा आहे तिथे पसरली जाईल. सर्व उष्णता आणि ऊर्जा अशी फैलावली की तापमान शून्यावर येऊन पोहोचेल. ही ‘हीट डेथ’ची स्थिती निर्माण झाल्यावर ब—ह्मांडाचा अंत होईल. ब—ह्मांडाचा यापूर्वी वेगाने विस्तार झाला होता. जर असाच वेगाने विस्तार होऊ लागला तर कोणतीही रचना शिल्‍लक राहणार नाही. अर्थातच हे सर्व अब्जावधी वर्षांनंतर घडेल. विसाव्या शतकामध्ये अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांनीही ब—ह्मांडाचा वेगाने विस्तार होत असल्याचे म्हटले होते. आकाशगंगा एकमेकींपासून दूर चालल्या असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदवले होते.

Back to top button