स्टोनहेंजमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीचे मानवनिर्मित खड्डे | पुढारी

स्टोनहेंजमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीचे मानवनिर्मित खड्डे

लंडन : इंग्लंडमधील पाच हजार वर्षांपूर्वीची विशाल दगडांची रचना ‘स्टोनहेंज’ नावाने प्रसिद्ध आहे. अनेक टन वजनाचे हे दगड रचून ही रचना त्या काळात कशी बनवली असेल याचे गूढच आहे. आता या ठिकाणी आणखी एका रहस्यमय गोष्टीचा छडा लागला आहे. तिथे खड्ड्यांचे एक जाळे सापडले असून हे खड्डे पाच हजार वर्षांपूर्वीच्या मानवांनीच बनवलेले असल्याचे निष्पन्‍न झाले आहे.

स्टोनहेंजच्या आसपासच्या क्षेत्रातील एका आर्कियोलॉजी ‘बायोप्सी’नंतर या खड्ड्यांचा छडा लागला होता. हे संशोधनाच्या क्षेत्रातील सर्वात मोठे सर्वेक्षण होते. या सर्व्हेमध्ये शेकडो मोठ्या खड्ड्यांचा छडा लागला. प्रत्येक खड्डा 2.4 मीटर (7.8 फूट) रुंदीचा आहे. संशोधकांनी म्हटले आहे की यापैकी बहुतांश खड्डे हे मानवनिर्मितच आहेत. स्टोनहेंज आणि एवेबरी वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी काम करणारे आर्कियोलॉजिस्ट निक स्नशाल यांनी सांगितले की नवे भूभौतिकिय सर्वेक्षण तंत्रज्ञान आणि उत्खननाच्या माध्यमातून स्टोनहेंजमध्ये मानवी रचनांचे सुरुवातीचे पुरावे आढळले आहेत. हे खड्डे नेमके कशासाठी उपयोगात आणले जात होते हे स्पष्ट झालेले नाही.

काय असतो संस्थानकालीन पटसोंगट्यांचा खेळ? | संस्थानकालीन पटसोंगट्याचा खेळ

Back to top button