पाण्याखालील लग्‍नासाठीही ‘वेडिंग डेस्टिनेशन’! | पुढारी

पाण्याखालील लग्‍नासाठीही ‘वेडिंग डेस्टिनेशन’!

लंडन : अनेक लोक एखाद्या खास ‘वेडिंग डेस्टिनेशन’वर जाऊन लग्‍न करीत असतात. सुंदर पर्यटनस्थळे ही अशीच वेडिंग डेस्टिनेशन बनलेली आहेत. आता चक्‍क पाण्याखालीही एक वेडिंग डेस्टिनेशन तयार होत आहे. खोल पाण्यातील या ठिकाणीही शाही विवाह सोहळा होऊ शकतो. तिथे रेस्टॉरंट, कॅसिनो वगैरे असेल आणि 120 पाहुणे थाटात या विवाह सोहळ्याचा आनंद घेऊ शकतील. हे ‘डेस्टिनेशन’ म्हणजे एक विशाल पाणबुडी आहे!

ही पाणबुडी 120 लोकांना घेऊन पाण्यात 200 मीटर खोलीवर जाऊ शकते. ही पाणबुडी संचालित करणारी कंपनी ‘यूडब्ल्यूईपी’ (अंडरवॉटर एंटरटेन्मेंट प्लॅटफॉर्म) एक मिशेलिन-स्टार रेस्टॉरंटही उपलब्ध करून देते ज्यामध्ये एका कॅसिनोबरोबर एक अनोखा वेडिंग डेस्टिनेशन हॉलही आहे. केवळ लग्‍न समारंभासाठीच नव्हे तर कॉर्पोरेट मीटिंग्ज आणि विविध सामाजिक कार्यक्रमांसाठीही या पाणबुडीचा वापर केला जाऊ शकतो.

या पाणबुडीत 120 लोक अठरा तास आरामात राहू शकतील. या पाणबुडीतून आजुबाजूची पाण्यातील दुनिया पाहता येऊ शकते. यामध्ये एक ‘सनडेक’ही आहे जिथून सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेता येऊ शकेल. या पाणबुडीला चौदा खिडक्या आहेत. त्यामधून प्रकाश येण्याबरोबरच आजुबाजूचे द‍ृश्य न्याहाळता येऊ शकते. या पाणबुडीत एक लक्झरी वॉशरूमही आहे जे बॅटरीवर संचालित होते.

व्हिडिओ पाहा : काय असतो संस्थानकालीन पटसोंगट्यांचा खेळ? | संस्थानकालीन पटसोंगट्याचा खेळ

Back to top button