डिजिटल कौशल्यास ‘डिमांड’! | पुढारी | पुढारी

डिजिटल कौशल्यास ‘डिमांड’! | पुढारी

नवी दिल्ली : संपूर्ण जगभरात येत्या चार ते पाच वर्षांमध्ये 3.9 अब्ज लोकांना डिजिटल स्किलचे ट्रेनिंग देण्याची गरज निर्माण होणार आहे. भारतात 2025 पर्यंत डिजिटली स्किल्ड कर्मचार्‍यांची गरज नऊ पटीने वाढेल. भारतातील सरासरी कर्मचार्‍यांना 2025 पर्यंत टेक्नॉलॉजी अपडेशन आणि इंडस्ट्री डिमांडनुसार सात नव्या डिजिटल स्किल्स म्हणजेच कौशल्य शिकून घ्यावी लागतील. एका सर्व्हेमधून ही माहिती देण्यात आली आहे.

अ‍ॅमेझॉनची एक कंपनी ‘अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस इंक’च्या रिसर्च रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की सध्या भारतात डिजिटल स्किल असलेल्या कर्मचार्‍यांची एकूण कर्मचार्‍यांच्या तुलनेत 13 टक्के संख्या आहे. डिजिटल कौशल्य हे उत्पादन आणि शिक्षण यासारख्या गैर टेक्निकल क्षेत्रासाठीही गरजेचे आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये क्लाऊड आर्किटेक्ट डिझाईन आणि ओरिजिनल डिजिटल कंटेन्टसारखे सॉफ्टवेअर आणि वेब अ‍ॅप्लिकेशन बनवण्याची क्षमता यासारख्या डिजिटल कौशल्यास 2025 पर्यंत बरीच मागणी असेल. मॅन्युफॅक्चरिंगच्या डिजिटल वर्कर्सनाही वाटते की पुढे अशा स्किल्सची गरज भासेल. 

एज्युकेशन सेक्टरमध्ये डिजिटल सिक्युरिटीला विकसित करण्याची क्षमता, सायबर फोरेन्सिक टूल्स आणि तंत्रज्ञान ही कौशल्ये आवश्यक ठरतील. वाढत्या इंटरनेट वापरामुळे आता शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणे गरजेचे बनले आहे. रिपोर्टनुसार भारतात अजूनही 76 टक्के डिजिटल कर्मचार्‍यांना क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये प्रशिक्षित होण्याची आशा आहे.

 

Back to top button