‘त्या’ लघुग्रहांच्या दिशेबाबतची मोहीम ‘नासा’ने ढकलली पुढे | पुढारी

‘त्या’ लघुग्रहांच्या दिशेबाबतची मोहीम ‘नासा’ने ढकलली पुढे

वॉशिंग्टन :

पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या दोन लघुग्रहांना एक अंतराळयान धडकवून त्यांची दिशा बदलण्याची ‘डार्ट’ मोहीम ‘नासा’ने आता पुढे ढकलली आहे. ‘डबल अ‍ॅस्टोरॉईड रिडायरेक्शन टेस्ट’ (डार्ट) असे या मोहिमेचे नाव आहे. ‘डिडिमोस’ नावाच्या ‘बायनरी अ‍ॅस्टोरॉईड सिस्टीम’साठी ही मोहीम आहे. यामध्ये दोन लघुग्रह एकत्रपणे भ—मण करीत आहेत.

एलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही खासगी कंपनी या मोहिमेत ‘नासा’ला मदत करीत आहे. यावर्षी 21 जुलै ते 24 ऑगस्ट या काळात ही मोहीम राबवण्यात येणार होती. मात्र, ती आता पुढे ढकलली असून आता ही मोहीम 24 नोव्हेंबर 2021 ते 15 फेब—ुवारी 2022 या काळात पार पाडली जाईल. मोहीम पुढे ढकलण्याचा निर्णय ‘नासा’च्या सायन्स मिशन डायरेक्टोरेटने घेतला आहे. मोहिमेआधी ‘डार्ट प्रोजेक्ट शेड्यूल’मधील ‘रिस्क मॅनेजमेंट’ म्हणजेच धोके हाताळण्याच्या क्रियेचे योग्य पद्धतीने अध्ययन करणे गरजेचे असल्याचे ‘एसएमडी’ने म्हटले आहे. जरी अंतराळयानाचे प्रक्षेपण 24 नोव्हेंबर 2021 ते 15 फेब—ुवारी 2022 दरम्यान केले गेले तरी ते ऑक्टोबर 2022 मध्येच ‘डिडिमोस’ला धडकवले जाईल. या धडकेने लघुग्रहांची दिशा बदलून ते पृथ्वीपासून दूर जातील. अशा पद्धतीची ही पहिलीच मोहीम आहे.

Back to top button