सोन्याचे नॅनोपार्टिकल क्लस्टर | पुढारी | पुढारी

सोन्याचे नॅनोपार्टिकल क्लस्टर | पुढारी

सिडनी ः कधी कधी सोन्याच्या खाणीतून अपेक्षेपेक्षाही अधिक सोने मिळते. त्यामागे कोणते कारण असावे हे आता संशोधकांनी शोधले आहे. नॅनोपार्टिकल्समुळे असे घडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोन्याच्या हाय-ग्रेड नलिकांमध्ये नॅनोपार्टिकल क्लस्टर असतात. त्यामुळे पृथ्वीच्या आतील स्तरांमधील भेगाही सोन्याच्या खाणी बनतात. 

प्रयोगशाळांमध्ये याबाबत करण्यात आलेल्या प्रयोगातून असे दिसून आलेले आहे की हायड्रोथर्मल तरल पदार्थांमध्ये पुरेशा प्रमाणात सोने मिसळणे अशक्य आहे जे पुढे जाड हाय-ग्रेड नलिका बनू शकतील. हायड्रोथर्मल तरल पदार्थ पृथ्वीच्या क्रस्टमधील मॅग्मामुळे गरम होतात. त्यामध्ये अनेक खनिजे आणि वायू असतात. नलिकांमध्ये विरघळलेले सोने नसते तर तरल पदार्थाबरोबर मिसळलेल्या पार्टिकल्स (कोलायडल) च्या रूपात असते. हे नॅनोपार्टिकल कोलॉईड असतात हे सिद्ध करणार्‍या प्रतिमा संशोधकांना मिळाल्या आहेत. सोने अनेक पद्धतीने मिळत असते. मात्र, एखाद्या खाण व्यावसायिकाला सोन्याच्या नलिका मिळणे स्वप्नवतच असते. हाय-ग्रेड सोन्याचे गोठलेले प्रवाह खडकांच्या भेगांमध्ये असतात. मात्र, त्या कशा बनतात हे अद्यापही एक कोडेच आहे!

Back to top button