एरोसोल स्प्रेचा ‘असा’ लागला शोध | पुढारी

एरोसोल स्प्रेचा ‘असा’ लागला शोध

लंडन ः आपल्या नेहमीच्या वापरातील अनेक वस्तू किंवा उपकरणांचा कसा शोध लागला, त्याचा वापर कधीपासून सुरू झाला याबाबतची माहिती घेणे हे रंजक ठरते. अशाच वस्तूंमध्ये ज्याला आपण नुसतेच ‘स्प्रे’ म्हणतो त्याचा समावेश आहे. शास्त्रीय भाषेत त्याला ‘एरोसोल स्प्रे’ म्हणतात. 

एरोसोल स्प्रेचा शोध नॉर्वेमधील एरीक रॉथीम या संशोधकाने 1926 मध्ये लावला. त्याने या शोधानंतर स्प्रेचे पेटंटही मिळवले. एरीक रॉथीम हे एक केमिकल इंजिनिअर होते. त्यांनी आपले पेटंट 1 लाख क्रोनर्समध्ये विकले. 1998 मध्ये या संशोधकाच्या सन्मानार्थ नॉर्वेच्या पोस्टाने एक टपाल तिकीटही काढले. आधुनिक एरोसोल स्प्रे लोकप्रिय करण्याचे कार्य 1949 मध्ये लिल गुडह्यू आणि निल्यम सुलिवन या दोन संशोधकांनी केले. दुसर्‍या महायुद्धात सैनिकांच्या तंबूत घोंगावणार्‍या डासांना मारण्यासाठी सुरुवातीला या एरोसोल स्प्रे कॅनचा वापर करण्यात आला. त्यामुळे त्याला ‘बग बाँब’ असे म्हटले जायचे!

Back to top button