युद्धनौकेलाही उचलू शकणारे जगातील सर्वात शक्‍तिशाली चुंबक | पुढारी

युद्धनौकेलाही उचलू शकणारे जगातील सर्वात शक्‍तिशाली चुंबक

पॅरिस ः फ्रान्सने जगातील सर्वात शक्‍तिशाली चुंबक तयार केले आहे. हे चुंबक इतके शक्‍तिशाली आहे की ते एखाद्या विमानवाहू युद्धनौकेलाही सहा फुटांपर्यंत वर उचलू शकते. खरे तर हे चुंबक ‘फ्युजन रिअ‍ॅक्टर’साठी तयार करण्यात आले आहे. सूर्य ज्या पद्धतीने ऊर्जानिर्मिती करतो त्याच पद्धतीने ऊर्जा निर्माण करण्यासाठी या चुंबकाचा वापर केला जाणार आहे.

पारंपरिक ऊर्जा साधनांवरील भार कमी करून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक मार्गाने ऊर्जानिर्मिती करण्यासाठी सध्या जगभरातील देश प्रयत्न करीत आहेत. याच प्रयत्नांचा हा एक भाग आहे. ‘इंटरनॅशनल थर्मोमॉलिक्यूलर एक्सपिरिमेंटल रिअ‍ॅक्टर’ (आयटीईआर) या जागतिक स्तरावरील प्रकल्पामध्ये हे चुंबक वापरले जाणार आहे. सूर्याप्रमाणे ऊर्जानिर्मितीसाठीचा प्रयोग ‘सेंट्रल सॉलेनॉईड’ नावाच्या या चुंबकाच्या मदतीने केला जाणार आहे. हे चुंबक फ्रान्समधील केंद्रीय ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असणार आहे. या महाकाय चुंबकाला ‘बिटिंग हार्ट ऑफ मशिन’ असेही म्हटले जाते. त्याची संकल्पना, निर्मिती आणि रचना ही ‘जनरल अ‍ॅटोमिक्स’ची आहे. 

Back to top button