२१ जून, वर्षातील सर्वात मोठा दिवस | पुढारी

२१ जून, वर्षातील सर्वात मोठा दिवस

नवी दिल्ली : आज म्हणजे 21 जून, हा दिवस सर्वात मोठा दिवस आहे. तसेच सोमवारची रात्र ही सर्वात लहान रात्र आहे. उत्तर गोलार्धात या दिवशी सूर्याची किरणे फारवेळपर्यंत असतात. म्हणजेच उत्तर गोलार्धावर 15 ते 16 तासांपर्यंत सूर्याची किरणे पडत असतात. यामुळेच या दिवसाला वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखले जाते. या दिवसाला ‘सोल्सटाईस’ असेही म्हटले जाते.

21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे, या दिवशी सूर्य हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सर्वात जास्त वेळ तळपत असतो. यामुळे दिवसाची रात्रही वर्षातील सर्वात लहान रात्र असते. यामुळेच उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. वर्षात एक दिवस असाही येतो की, त्या दिवसाला झीरो शॅडो दिवस म्हणून ओळखले जाते. मात्र, 21 जूननंतर दिवसाचा अवधी कमी होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. 21 सप्टेंबर येताच दिवस आणि रात्र समान कालावधीचे असतात. 21 सप्टेंबरनंतर रात्रीचा कालावधी वाढू लागतो. ही प्रक्रिया 23 डिसेंबरपर्यंत सुरू असते. या कालावधीत उत्तर गोलार्धात सूर्य कमी वेळ तळपत असतो. म्हणजेच सूर्याचे तापमान कमी असते. याच कालावधीला आपण हिवाळा म्हणूनही ओळखतो. या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते.

 

Back to top button