सर्वात दुर्मीळ जलचर | पुढारी

सर्वात दुर्मीळ जलचर

न्यूयॉर्क : जगातील सर्वात दुर्मीळ जीवांमध्ये किंवा जलचरांमध्ये वॅक्‍विटा पॉरपॉईजचा समावेश होतो. लुप्‍त होत असलेल्या जीवांच्या यादीत या माशाचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. जगात त्यांची संख्या अवघी दहाच शिल्‍लक राहिलेली आहे. हा जगातील सर्वात दुर्मीळ सागरी सस्तन प्राणी आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की या जलचराला नामशेष होण्यापासून रोखता येणे शक्य आहे.

वॅक्‍विटा हा एक सागरी सस्तन जीव आहे. करड्या आणि रूपेरी रंगाच्या या जलचरांचे वास्तव्य मेक्सिकोचे आखात आणि कॅलिफोर्नियाजवळ आहे. त्यांची लांबी जास्तीत जास्त 5 फुटांपर्यंत असते आणि वजन 54 किलोग्रॅम असते. शिकार्‍यांच्या जाळ्यात अडकत असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. त्यांची संख्या घटण्याचे दुसरे कारण म्हणजे तोतोआबा मासे नष्ट होणे. वॅक्‍विटाचा मुख्य आहार हेच मासे असतात. बेसुमार मासेमारीमुळे तोतोआबाही नष्ट झाले आहेत. त्यामुळे वॅक्‍विटाही आता अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधिका जॅकलिन रॉबिन्सन यांनी सांगितले की या माशांना लुप्‍त होण्यापासून वाचवले जाऊ शकते. जर आपण त्यांच्या नैसर्गिक अधिवासामधून मासेमारीचे जाळे हटवले तर हे जीव बचावू शकतात. पुढील 50 वर्षांमध्ये हे मासेही आपली संख्या वाढवू शकतील.

Back to top button