लंडन : तब्बल 1700 वर्षांपूर्वीच्या सँडलचा शोध | पुढारी

लंडन : तब्बल 1700 वर्षांपूर्वीच्या सँडलचा शोध

लंडन : संशोधकांनी नॉर्वेमधील एका पर्वतावर 1700 वर्षांपूर्वीच्या सँडलचा शोध लावला आहे. या बर्फाच्छादित पर्वतावर लोह काळातील हे सँडल अजून टिकून राहिलेले आहे हे विशेष. हा पर्वत जुन्या काळातील प्रवासाच्या मार्गावर होता.

हॉर्स आईस पॅच नावाच्या ठिकाणी एका गिर्यारोहकाला हे सँडल सापडले. त्यानंतर त्याने ‘सिक्रेटस् ऑफ द आईस’मधील संशोधकांशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. संशोधकांनी या सँडलचा तपशीलवार अभ्यास करून त्याचा काळ शोधून काढला. एस्पेन फिनस्टॅड या संशोधकाने याबाबतची माहिती दिली.

या सँडलचा रेडिओकार्बन तंत्राने काळ शोधला असता हे सँडल इसवी सन 300 या काळातील असल्याचे स्पष्ट झाले. याच ठिकाणी संशोधकांनी जुन्या काळातील कापडाचाही तुकडा सापडला होता. मात्र, या सँडलइतकी जुनी वस्तू तिथे सापडलेली नाही. नॉर्वेच्या अंतर्गत भागाला समुद्र किनार्‍याशी जोडणारा मार्ग या पर्वतावरून जात होता. त्यावेळी अनेक लोकांची तेथून ये-जा सुरू असे.

कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये चित्र-शिल्पातून दिला जातोय शाहू विचारांना उजाळा | शाहू कृतज्ञता पर्व

Back to top button