उन्हाळ्यात ‘हे’ लाभदायक | पुढारी

उन्हाळ्यात ‘हे’ लाभदायक

उन्हाच्या तडाख्याने सध्या लोकांना त्रस्त करून सोडले आहे. अशावेळी केवळ पेयेच उपयोगी ठरतात असे नाही. काही भाज्या, पालेभाज्याही शरीर थंड तसेच हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करीत असतात. त्यांचा आहारात समावेश करणे लाभदायक ठरते, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा भाज्यांची ही माहिती…

टोमॅटो

शरीराला थंड ठेवण्यासाठी टोमॅटो गुणकारी ठरतात. टोमॅटोमध्ये 95 टक्के पाणी असते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठीही ते उपयुक्‍त ठरते. यामध्ये असलेले ‘लाइकोपिन’ आरोग्यासाठीही लाभदायक आहे.

दुधी भोपळा

दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात याचा आहारात समावेश करणे लाभदायक ठरते. दुधीमुळे शरीर थंड आणि हायड्रेट राहतेच, शिवाय त्यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्यासाठीही लाभदायक आहे.

पालेभाज्या

अनेक हिरव्या पालेभाज्या उन्हाळ्यात लाभदायक ठरतात. त्यामध्ये पालक, मेथी, राजगिरा आणि पुदिनाचा समावेश होतो. या भाज्यांमध्येही पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते.

कारली

चवीला कडू असली तरी कारली आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. विशेषतः उन्हाळ्यात कारल्यांचे सेवन गुणकारी ठरते. यामुळे शरीर थंड राहते तसेच पचनसंस्था आणि रक्‍तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठीही मदत होते.

Back to top button