महाराणीच्या रूपातील बार्बी | पुढारी

महाराणीच्या रूपातील बार्बी

लंडन ः ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी गुरुवारी 96 व्या वर्षात पदार्पण केले. राजसिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेल्या महाराणीची लोकप्रियता मोठीच आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्याभिषेकाचे हे 70 वे वर्षही आहे. त्यानिमित्ताने खेळणी उत्पादक मेटल टॉईजने महाराणी एलिझाबेथसारख्या दिसणार्‍या बार्बी डॉलची मर्यादित आवृत्ती लाँच केली.

ही बाहुली 75 डॉलर्स म्हणजेच 5,700 रुपयांना विकली गेली. कंपनीच्या वेबसाईटवरून या बाहुल्यांची विक्री करण्यात आली. या बाहुलीला आयव्हरी रंगाचा गाऊन आणि ब्ल्यू रिबन परिधान करण्यात आले आहे. राणीने लग्‍नात परिधान केलेल्या मुकुटासारखा मुकुटही या बाहुलीस घालण्यात आला आहे.

राणीच्या रूपातील ही बाहुलीही चांगलीच लोकप्रिय ठरली आणि या बाहुल्यांचीही हातोहात विक्री झाली. लहान मुलींच्या भावविश्‍वात बाहुल्यांचे स्थान मोठेच असते. जगभरात बार्बी बाहुल्याही लोकप्रिय आहेत आणि त्या अनेक रूपांमध्ये बनवल्या जात असतात. आता महाराणीच्या वाढदिवसाचे निमित्त करून बनवलेली ही बाहुलीही लोकप्रिय ठरली.

हेही वाचलंत का? 

Back to top button