सूर्यावर स्फोट; सतरा ज्वाला उडाल्या अंतराळात! | पुढारी

सूर्यावर स्फोट; सतरा ज्वाला उडाल्या अंतराळात!

वॉशिंग्टन ः सूर्यावरील स्फोट पृथ्वीसाठीही चिंतेचा विषय बनत असतात. आताही तिथे स्फोट झाला असून त्याच्या किमान सतरा ज्वाला अंतराळात उडाल्या. या ज्वाला मध्यम स्वरूपाच्या भू-चुंबकीय वादळाच्या रूपाने पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतात.

सूर्यावरील स्फोट एका अतिसक्रिय ‘सनस्पॉट’वर झाला. त्याला ‘एआर 2975’ असे म्हटले जाते. हा भाग 28 मार्चपासूनच भडकत होता. ज्यावेळी चुंबकीय रेषा वक्र होतात आणि द‍ृश्य पृष्ठभागाजवळ अचानक पुन्हा संरेखित होतात त्यावेळी सूर्यावर असे स्फोट होतात. कधी कधी हे स्फोट कोरोनल मास इंजेक्शन किंवा भारीत कणांच्या प्रवाहांशीही निगडित असतात. सूर्याच्या प्रभामंडळातून ते अंतराळात उत्सर्जित होतात.

‘नासा’च्या शक्‍तिशाली ‘सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी’ने या सौर स्फोटांची थक्‍क करणारी छायाचित्रे टिपली आहेत. सोलर अँड हेलिओस्फेरिक ऑब्झर्व्हेटरीनेही अशीच छायाचित्रे टिपली होती. 31 मार्च आणि 1 एप्रिलला या स्फोटाचे काही चुंबकीय परिणाम पृथ्वीपर्यंत येऊ शकतात. कृत्रिम उपग्रह, संचार व्यवस्था यावर त्याचे परिणाम होत असतात.

हेही वाचलंत का? 

Back to top button