साडेतीन फुटी इब्राहिमचा अखेर झाला निकाह | पुढारी

साडेतीन फुटी इब्राहिमचा अखेर झाला निकाह

मेरठ ः येथील साडेतीन फूट उंचीच्या इब्राहिमला अखेर आयुष्याची जोडीदारीण मिळाली आहे. त्याच्याइतक्याच उंचीच्या तरुणीशी शनिवारी त्याचा निकाह झाला. मेरठच्या कंकरखेडा भागात हे लग्‍न चर्चेचा विषय बनले. एके काळी इब्राहिमने आपले लग्‍न लावून देण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांनाही साकडे घातले होते!

इब्राहिमचा 46 इंच म्हणजेच सुमारे साडेतीन फूट उंचीच्या इमराना हिच्याशी निकाह झाला. हापूड येथील रहिवासी असलेल्या इब्राहिमची उंचीही 46 इंचच आहे. तो 38 वर्षांचा असून इमराना 36 वर्षांची आहे. इब्राहिम अनेक वर्षांपासून लग्‍नासाठी वधू शोधत होता. मात्र, कमी उंचीमुळे त्याचे लग्‍न जमत नव्हते. अखेर ‘रबने बना दी जोडी’ म्हटले जाते तसे त्याचा इमरानाशी निकाह झाला!

दोघांनी पहिल्याच भेटीत एकमेकांना पसंत केले होते. इब्राहिम गाड्यावर फळे विकतो. अनेक वर्षे वधू शोधूनही मिळत नसल्याने त्याने पोलिसांपासून नेत्यांपर्यंत अनेकांना आपल्याला मनपसंद वधू शोधून द्यावी व लग्‍न लावून द्यावे, असे साकडे घातले होते.

हेही वाचलंत का?

Back to top button