Earth : फिरण्यापासून पृथ्वीस कोण थांबवेेल? | पुढारी

Earth : फिरण्यापासून पृथ्वीस कोण थांबवेेल?

वॉशिंग्टन : आपल्या ब्रह्मांडाच्या निर्मितीची सुरुवात कशी झाली. ब्लॅक होल कशी तयार झाली, अशा अवकाशीय घटनासंबंधीच्या प्रश्‍नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न खगोलशास्त्रज्ञ सातत्याने करत असतात. असाच एक प्रश्‍न आहे आणि तो म्हणजे पृथ्वीचे फिरणे थांबेल का आणि थांबल्यास नेमके काय होईल?

तसे पाहिल्यास पृथ्वीची निर्मिती साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हापासून पृथ्वी स्वत:भोवती फिरत असतानाच सूर्याभोवतीही फिरत असते. जीवसृष्टी असलेल्या पृथ्वीची निर्मिती सूर्यमालेत पसरलेली धूळ आणि गॅसच्या अवशेषांपासून एका डिस्कच्या रूपात झाली जी सूर्याभोवती चकरा मारू लागली. त्यानंतर पृथ्वीसह अनेक ग्रहांची निर्मिती झाली. आपली पृथ्वी ही निर्माण झाल्यापासूनच सूर्याभोवती फिरत आहे. खरोखरच पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फिरणे थांबले तर दिवसातील 24 तासांदरम्यान होणार्‍या बहुतेक सार्‍या घटना घडण्यापासून थांबतील.

स्वतःभोवती फिरण्यापासून पृथ्वीला रोखणारे दुसरे कोणतेच बल अस्तित्वात नाही. असे असले तरी पृथ्वीच्या फिरण्यावर एका गोष्टीचा प्रभाव पडतोय आणि ते म्हणजे चंद्राचे गुरुत्वाकर्षण. मात्र, याचा जास्त परिणाम होत नाही. अशातच पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर संथपणे वाढत आहे. यामुळे चंद्राच्या गुरुत्वाचा प्रभाव घटत जाईल. पृथ्वीवर एखादा ग्रह अथवा विशालकाय लघुग्रह धडकला तर कदाचित पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे थांबू शकते. असे जर झाले तर पृथ्वीवर घडणार्‍या तमाम घटना घडण्यापासून थांबू शकतात.

 

 

Back to top button