दहा भुजांच्या ऑक्टोपसला बायडेन यांचे नाव! | पुढारी

दहा भुजांच्या ऑक्टोपसला बायडेन यांचे नाव!

न्यूयॉर्क :  ऑक्टोपस आणि व्हॅम्पायर स्क्वीड हे जलचर त्यांच्या आठ भुजांसाठी ओळखले जातात. मात्र, त्यांच्या कुळातील एका प्राचीन पूर्वजाला आठ नव्हे तर दहा भुजा होत्या. या ऑक्टोपसच्या शोधण्यात आलेल्या नव्या प्रजातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे नाव देण्यात आले आहे. ‘सिल्लीप्सिमोपोडी बायडेनी’ असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. तब्बल 32 कोटी 80 लाख वर्षांपूर्वीच्या काळात हा ऑक्टोपस अस्तित्वात होता.

या ऑक्टोपसच्या शरीरामध्ये वरील भागात डोके होते ज्याची लांबी होती 3 इंच. या डोक्यावर डोळे नव्हते. एखाद्या प्रौढ माणसाच्या तळहाताइतक्या आकाराचे हे डोके होते. हा ऑक्टोपस सध्याच्या ऑक्टोपस आणि व्हॅम्पायर स्क्वीडचा अतिप्राचीन पूर्वज असल्याने या दोन्ही प्रजातींच्या कुळाचे अस्तित्व आणखी 8 कोटी 20 लाख वर्षांनी मागे गेले आहे. या ऑक्टोपसचे जीवाश्म मोंटानाच्या फर्गस कौंटीमध्ये सापडले होते.

1988 मध्ये कॅनडाच्या रॉयल आँटारिओ म्युझियमला दान करण्यात आले. मात्र, त्याच्यावर अगदी अलीकडच्या काळापर्यंत अभ्यास करण्यात आलेला नव्हता. आता दोन संशोधकांनी त्याचा अभ्यास करून ही ऑक्टोपसची एक नवी, वेगळी प्रजाती असल्याचे सांगितले.

Back to top button