बीजिंग : साप, विंचवाची ‘रूचकर’ डिश | पुढारी

बीजिंग : साप, विंचवाची ‘रूचकर’ डिश

बीजिंग : जगभरात जेवणासाठी तयार करण्यात येणार्‍या अनेक प्रकारच्या रूचकर डिशबद्दल ऐकला असणार. मात्र, यामध्ये अशाही एका डिशचा समावेश आहे की, तिच्याबद्दल ऐकून अंगावर शहारे आल्याशिवाय राहात नाही. उन्हाळा सुरू झाला की, या डिशची मागणी चीनमध्ये वाढते. ही डिश विषारी साप आणि विंचवांचा वापर करून तयार केली जाते.

ठरवळळ उहळपर वेबसाईटच्या माहितीनुसार, चीनच्या गुआंगडाँग प्रांतात ही भयावह डिश तयार करून खवय्यांना विकली जाते. या डिशसाठी विषारी आणि भयंकर जीव असलेले साप आणि विंचू या जीवांचा वापर केला जातो. या चिनी प्रांतात या दोन विषारी जीवांचा वापर करून सूपही तयार केले जाते. मागणीनुसार त्यात मगरीचे मांस आणि खासप्रकारचे मसालेही घातले जातात. चिनी लोकांच्या मते, हे खास सूप प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. उल्लेखनीय म्हणजे, हे सूप तेथील संस्कृतीचा एक भागच आहे. काही खास रेस्टॉरंटमध्येच हे सूप व डिश तयार केली जाते.

Back to top button