वेगाने चालल्यास हार्टअ‍ॅटॅकचा धोका तब्बल ३४ टक्क्यांनी घटतो | पुढारी

वेगाने चालल्यास हार्टअ‍ॅटॅकचा धोका तब्बल ३४ टक्क्यांनी घटतो

न्यूयॉर्क : ‘चालणे’ हा एक अत्यंत चांगला व्यायाम असून, त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत होते, असा निष्कर्ष आतापर्यंत अनेक संशोधनांतून काढण्यात आला आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातील दाव्यानुसार वेगाने चालल्यास हार्टअ‍ॅटॅकचा धोका तब्बल 34 टक्क्यांनी घटतो.

अमेरिकेतील ‘ब्राऊन युनिव्हर्सिटी’च्या शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन ‘जेरियाट्रिक्स सोसायटी जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. दोन दशकांपर्यंत महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनातून असे सिद्ध झाले की, वाढत्या वयामुळे हृदयाला संभवणारा धोका चालण्याच्या माध्यमातून कमी करता येतो. शास्त्रज्ञांनी सुमारे दोन दशके 25 हजारांहून अधिक वयस्क महिलांवर हे संशोधन केले. संशोधन काळात सुमारे 1455 महिलांचे हार्ट फेल झाले. हार्ट फेल म्हणजे संपूर्ण शरीरात रक्त पंप करण्यास हृदय सक्षम नसणे. संशोधनात सहभागी महिलांना त्यांच्या चालण्याविषयीचे प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे संशोधनाचे निष्कर्ष काढण्यात आले.
सावकाश चालण्यापेक्षा वेगाने चालल्यास शरीराला चांगला लाभ मिळतो, तसेच वाढत्या वयातील धोक्यांपासून बचाव करण्यासाठी नियमित चालणे महत्त्वपूर्ण ठरते, असे संशोधकांचे मत आहे.

 

Back to top button