हत्ती करतो नाच! | पुढारी

हत्ती करतो नाच!

नवी दिल्‍ली : पाळीव हत्तींकडून अनेक प्रकारची कामे करवून घेतली जात असतात. अशा हत्तींना अगदी नाचण्याचेही धडे दिले जातात. आता अशाच एका नृत्य करणार्‍या हत्तींचा व्हिडीओ सोशल मीडियात लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या व्हिडीओमध्ये एक हत्ती नटूनथटून उभा असल्याचे दिसून येते. पार्श्‍वभूमीवर एक गाणे वाजवले जात आहे आणि त्या तालावर हा हत्ती नाचू लागतो. मग हत्तीचा माहुतही येऊन तोही त्याच्यासमवेत नाचू लागतो. मागचे पाय हलके दाबून पुढच्या पायाने हा हत्ती नाचतो. त्याचे हे नृत्य गरबासारखे दिसत असल्याने अनेकांना या हत्तीचे कौतुक वाटत आहे. हा छोटा हत्ती सोंड वर करून अतिशय वेगाने पुढच्या दोन पायांच्या हालचाली करतो. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळण्यास मार्ग नसला तरी तो चांगलाच व्हायरल झाला आहे. थायलंडमध्ये हत्ती संगोपन केंद्रातील अनेक हत्ती चक्‍क सोंडेत ब—श धरून सुंदर चित्रेही काढतात.

Back to top button