कॅलिफोर्निया : व्यक्‍तीच्या घरावर तब्बल 124 सापांनी हल्ला | पुढारी

कॅलिफोर्निया : व्यक्‍तीच्या घरावर तब्बल 124 सापांनी हल्ला

कॅलिफोर्निया : अमेरिकेत नुकतीच आश्‍चर्यचकित करणारी घटना उघडकीस आली आहे. तेथे एका व्यक्‍तीच्या घरावर तब्बल 124 सापांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्या व्यक्‍तीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. ही भयानक घटना पाहून परिसरातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

जगातील अशी ही पहिलीच घटना आहे की, त्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने सापांनी कोणा एकाच्या घरी हल्ला केला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भयानक घटना अमेरिकेतील मेरिलँड येथील आहे. 19 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता सुमारे सव्वाशे सापांनी 49 वर्षीय व्यक्‍तीच्या घरावर हल्लाबोल केला. स्थानिक लोकांना फारवेळ घरातील व्यक्‍ती दिसून न आल्याने त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

 विषारी साप
कॅलिफोर्निया : 124 विषारी सापांनी केला घरावर हल्‍ला

या लोकांनी सांगितले की, खरंच ही एक भयानक घटना आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात येऊन पोलिसांनी दरवाजा उघडताच त्यांनाही घाम फुटला. कारण, 49 वर्षीय व्यक्‍ती मृतावस्थेत फरशीवर पडली होती, तर आजूबाजूला जोरजोराने फुत्कारत साप इकडे-तिकडे फिरत होते. महत्प्रयासाने सापांच्या गराड्यातून त्या व्यक्‍तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो पोस्टमार्टेमसाठी पाठविला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्‍तीच्या घरातून तब्बल 124 साप पकडण्यात आले. यामध्ये एका 14 फूट बर्मिज अजगराचाही समावेश होता. हे सर्व साप त्या व्यक्‍तीच्या घरात तसेच घराबाहेर फिरत होते. असेही म्हटले जात आहे की, मृत व्यक्‍तीने हे साप पाळले होते. मात्र, याचा सुगावा शेजारच्या लोकांना नव्हता. एकाच घरात इतक्या मोठ्या संख्येने साप सापडण्याची अमेरिकेतील ही पहिलीच घटना असावी. हे सर्व साप अखेरीस चार्ल्स कौंटी अ‍ॅनिमल कंट्रोलने पकडले.

हेही वाचलतं का? 

Back to top button