पुणे : पुढारी वृत्तसेवा
गुन्हे शाखेच्या समाजिक सुरक्षा विभागाने कोरेगाव पार्कमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यावसायाचा पर्दाफाश करत नऊ मुलींची सुटका केली. लॉकडाऊनच्या काळात सर्व आस्थापना बंद आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी निर्धारीत वेळेच्या बंधनाचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाईचा बडगा उगारतात. मात्र येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्याचे तर या गोरखधंद्याला अभय नव्हते ना? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अधिक वाचा : पुणे : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश मटणवाले 'चाचा' वेशांतर करून पोहोचले पोलिस स्टेशनमध्ये!
कोरेगाव पार्क परिसरातील योगनिद्रा व फेमिना स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार साध्या वेशात पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी तेथे वेश्याव्यावसाय सुरू असल्याचे समजले.
त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करून छापा टाकून योगनिद्रा स्पा सेंटरमधील मॅनेजर शुभम प्रेमकुमार थापा (वय22), व फेमीना स्पा मधील मॅनेजर अफताबउद्दीन नरुद्दीन (वय 27, रा. दोघेही कोरेगाव पार्क मुळ असाम) या दोघांना ताब्यात घेतले.
अधिक वाचा : पुणे : महाआघाडीतील नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या १३ जणांवर गुन्हा दाखल; एकास अटक
याबाबत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही मसाज सेंटरचे मालक चाँद बिबी रमजान मुजावर व अब्दुल आसिफ फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कामगिरी केली.